कविता:अनोळखी रस्ते (jivnavar kavita in marathi)

jivnavar kavita in marathi
आयुष्य जीवनावर मराठी स्टेटस

ही मराठी कविता जीवनातील संघर्षावर(jivnavar kavita in marathi )आधारित आहे . तुम्हाला जर जीवनावरील शायरी (jivnavar shayari) आवडत असेल तर ही कविता तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर आयुष्य जीवनावर मराठी स्टेटस (Marathi Status On Life )हवा असेल तर ह्या कवितेतील भावना तुम्हाला नक्की आवडतील. ही एक प्रेरणादायी मराठी कविता आहे.

कविता:अनोळखी रस्ते (jivnavar kavita in marathi)

अनोळखी रस्ते शोधत अनोळखी स्वप्नांत रमतो मी
अंधाराचे गीत गातो प्रकाशात गुदमरतो मी

कोण राहते सोबतीला आयुष्यभरासाठी इथे
मी सूर्य उगवतो पहाटेला अन् संध्याकाळी बुडतो मी

रोजचेच ते हसणे रडणे रोजचीच ती गाऱ्हाणी
रोज नवी सुरुवात पुन्हा ती रोज नव्याने हरतो मी

कुणा कुणा ला खुश ठेऊ मी कुणा कुणा ला थांबवू
जे तुझेच आहे तुज पाशी येईल उगा कशाला झुरतो मी

होतील चुका तुझ्याकडूनही तू कुठे भगवान आहेस
आपल्याच चुकांतून शिकून पुन्हा नव्याने घडतो मी

अंधाराला जाळण्यासाठी प्रकाश काजव्याचा हो प्रशांत
अथांग अंधाराच्या सागरात आशेचा दिवा जाळतो मी

- आढांगळे प्रशांत

कवितेचा सोप्या भाषेत थोडक्यात अर्थ

जीवन हा एक प्रवास आहे. प्रत्येक क्षणी जीवनात आपण अनेक अनोळखी रस्त्यांवरून चालत असतो. पण त्यातच खरी जीवनाची मजा आहे. ह्या अनोळखी रस्त्यांवरून चालतांना आपल्याला अनेक संघर्षाला सामोरे जावे लागते. त्या रस्त्यांवर आपल्याला अनोळखी माणसेही भेटतात. त्यातील काही आपल्या आयुष्यात थांबतात तर काही निघून जातात.

आपल्या आयुष्यात कधी हसणे येते तर कधी रडणे. रोजच्या आयुष्यातील संघर्षांत आपण कधी हरतो तर कधी जिंकतो , पण आपण रोज काही नवे शिकले पाहिजे भले आपल्या पदरी हरणे येईल. आपण रोज नव्याने हरले पाहिजे .आपल्या आयुष्यात जी काही माणसे येतात त्या प्रत्येकाला आपण खुश नाही ठेऊ शकत. त्यामुळे जो खरच आपला माणुस आहे तो आपल्या जीवनात राहतो.

आपण माणूस आहोत त्यामुळे अनोळखी रस्त्यांवरून चालतांना आपल्याकडून खूप सार्‍या चुका होऊ शकतात. पण महत्वाचे हे आहे की त्या चुकांतून शिकून आपण आयुष्याला चांगला आकार दिला पाहिजे.

भले ही जीवनात संकट रूपी अंधार अथांग सागरा प्रमाणे पसरलेला असेल. ह्या अथांग अंधारात भले ही आपण छोट्या काजव्या समान असू. पण आपण अंधारावर मात करण्यासाठी इवलू सा का होईना आपला प्रकाश पसरवत राहायचा. आणि जसा सूर्य सकाळी उगवून संध्याकाळी बुडतो त्याप्रमाणे जीवनाच्या संध्याकाळी एके दिवशी बुडून जायच.

जीवनावर मराठीत Quotes (Quotes On Life In Marathi)

ह्या कवितेतील प्रत्येक ओळ ही जीवनाच्या वास्तवाचे वर्णन (Quotes On Life In Marathi ) करते. प्रत्येक ओळीत शिकण्यासारखे काहीतरी आहे . याचा तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच उपयोग होईल. तुम्हाला जर ही कविता ऐकायला आवडेल तर तुम्ही ती यूट्यूब वर बघु शकता . त्याची लिंक खाली दिली आहे.

Leave a Comment